रिलायन्सची जिओ 4G ही टेलिकॉम क्षेत्रात महाक्रांती ठरेल, असा विश्वासही मुकेश अंबांनीनी व्यक्त केला.
https://twitter.com/ANI_news/status/771231609290842112
जिओ 4G या सेवेवर तुम्हाला आयुष्यभर मोफत कॉलिंग, मोफत मेसेजेच, मोफत रोमिंग या सेवा उपलब्ध होणार आहेत. तसंच डिसेंबर 2016 पर्यंत 4G डेटा फुकटात मिळणार आहे.
त्यानंतर केवळ आणि केवळ इंटरनेटसाठी पैसे द्यावे लागतील. पण हा दरही केवळ 50 रुपयात 1GB डेटा मिळणार आहे.
इंटरनेटचे चार्जेसचे सोडून तुम्हाला इतर कोणत्याही सेवेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. डिसेंबरनंतर एका जीबी डेटासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन
रिलायन्स जिओचा 4G प्लॅन हा जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन असल्याचा दावा मुकेश अंबांनीनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनच्या दृष्टीकोनातून ही सेवा महत्वाचं असल्याचं यावेळी मुकेश अंबानी यांनी म्हटलं.
इतक्या स्वस्त दरात टेलिकॉम सुविधा देणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरली आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील अनेक समीकरणंही बदलणार आहेत.
थोड्याच दिवसात दहा कोटी ग्राहक करुन जागतिक विक्रम करण्याची इच्छा असल्याचा मानस यावेळी मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवला.
काय आहेत जिओची वैशिष्ट्ये?
- आयुष्यभरासाठी आऊटगोईंग कॉलिंग फ्री. STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री
- आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री
- ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS दर वाढणार नाही.
- डेटासाठी जास्त खर्चाची गरज नाही
- विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के वाढीव डेटा
- डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ 50 रुपयात 1GB 4G डेटा
या स्मार्टफोनवर चालेल जिओ 4G
रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असूस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.
काय आहे जिओची ऑफर?
रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा देत आहे. जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे.
या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत. जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह, जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत.
असं मिळवा जिओ सिम!
- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.
- त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
- ही प्रोसेस केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला भेट द्या.