रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 03:45 AM (IST)
नवी दिल्लीः रिलायन्सची बहुप्रतिक्षित जिओ 4 जी सेवा आज लाँच होणार आहे. रिलायन्सने 4 जीच्या चाचणीसाठी ग्राहकांना आकर्षक ऑफर दिल्या आहेत. ग्राहकांनाही या सेवेची चांगलीच भुरळ पडली असून लाखो ग्राहकांनी जिओ सिम खरेदी केले आहेत. रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, एसुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे. काय आहे जिओची ऑफर? रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा देत आहे. जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे. या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत. जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह, जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत. संबंधित बातम्याः