नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल ठरला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मोबाईल डेटा यूसेजमध्ये आपण अमेरिका आणि चीनलाही मागे टाकलं आहे.

दर महिन्याला भारतीय यूझर्स 150 कोटी जीबी मोबाईल डेटा वापरतात. आश्चर्याची बाब म्हणजे, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डेटाला एकत्रित केलं, तरीही एकट्या भारतातील मोबाईल डेटाचा वापर जास्त होतो.

गेल्या काही दिवसांत टेलिकॉम कंपन्यांतील मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. ग्राहकांना कमीत कमी दरात जास्तीत जास्त डेटा देण्याची स्पर्धा भारतात सुरु आहे.

भारतातील सरासरी इंटरनेट यूझर्स हे मोबाईल वापरण्याच्या कालावधीपैकी 70 टक्के वेळ व्हॉट्सअॅप, फेसबुक, म्युझिक आणि एन्टरटेनमेंट अॅप्सवर घालवतात, असा दावा गेल्या आठवड्यात ओमिदयार नेटवर्कने जारी केलेल्या अहवालात केला आहे.