5G Network : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवेची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर भारत सरकार अॅपल(Apple) , सॅमसंग (Samsung) आणि इतर मोबाईल फोन निर्मात्यांना 5G नेटवर्क (5G Network) जलद करण्यासाठी तसेच फोनचे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी दबाव आणणार आहे. सरकारने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे. जेव्हा टेलीकॉम कंपन्याचे अनेक मॉडेल्स या हाय-स्पीड सेवेसाठी तयार नसल्याने चिंता व्यक्त करत आहेत. 


आठ शहरांमध्ये सेवा उपलब्ध
5G सेवा सुरू करताना, रिलायन्स जिओने सांगितले होते की, ही सेवा चार शहरांमध्ये आणली जाईल, तर भारती एअरटेल आठ शहरांमध्ये सेवा उपलब्ध करेल. पुढील वर्षी या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगितले. दरम्यान, Apple चे iPhone मॉडेल, त्यात आता नवीन iPhone 14 आणि Samsung चे अनेक फोन आहेत, जे भारतात 5G सुसंगत नाही.



5G लवकर स्वीकारण्यासाठी बैठक
5G लवकर स्वीकारण्यासाठी दूरसंचार आणि आयटी विभागाचे अधिकारी एक बैठक घेणार आहेत. Apple, Samsung, Vivo आणि Xiaomi चे अधिकारी तसेच देशांतर्गत दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


बैठकीसाठी नोटीस जारी
क्लोज-डोअर बैठकीसाठी जारी केलेल्या नोटीसमध्ये, असे म्हटले आहे की, बैठकीच्या अजेंड्यात हाय-स्पीड नेटवर्कला समर्थन देण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड बाबत चर्चा असेल. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या Apple ने Samsung Electronics, Vivo, Xiaomi Corp तसेच देशांतर्गत टेलिकॉम ऑपरेटर्ससह या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही


कृषी आणि आरोग्य क्षेत्रांना फायदा
भारत सरकारने म्हटले आहे की, चीननंतर जगातील सर्वात मोठ्या मोबाइल बाजारात 5G लाँच केल्याने ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट, तसेच कृषी आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील. सूत्रांनी सांगितले की, telcome आणि स्मार्टफोन कंपन्या एकमेकांशी चर्चा करत आहेत. तसेच 5G तंत्रज्ञान आणि भारतातील telcom कंपन्यांसाठी विशिष्ट फोन सॉफ्टवेअरमधील सुसंगतता तसेच समस्या सोडवण्यासाठी वेळ लागत आहे.


एअरटेलकडून चिंता व्यक्त
एअरटेलच्या वेबसाइटने मंगळवारी 5G कंपॅटिबल सेक्शन अंतर्गत Apple iPhones चे 12 ते 14 मॉडेल्सना नॉन-कंपॅटिबल म्हणून दाखवले. त्याच वेळी, सॅमसंगचे बरेच मॉडेल देखील 5G सेवेशी सुसंगत नाहीत. एअरटेल याविषयी खूप चिंतित आहे कारण त्यांचे बरेच प्रीमियम ग्राहक Apple डिव्हाईस वापरत आहेत.