Google Travel : तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल, तर त्यासाठी गुगल (Google) तुम्हाला मदत करेल. सर्च इंजिन गुगलने ट्रॅव्हल प्लॅनिंग टूल अपडेट केले आहे. इथे युजरला प्रवासाशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यासाठी, Google ने Google Travel वेबसाइट google.com/travel लाँच केली आहे. प्रवासाच्या ठिकाणी कसे पोहोचायचे? कुठे जायचे? कुठे मुक्काम करायचा? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील. मोबाईलसाठी सुद्धा हे फिचर सुरू करण्यात आले होते, मात्र आता त्याची वेब आवृत्ती देखील सुरू करण्यात आली आहे.


फ्लाइट सर्च करण्याचा पर्यायही
गुगल यूजर्सला अशी अनेक फीचर्स देते ज्याचा वापर ते त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन करताना करू शकतात. हॉटेलचा शोध घ्यायचा असो किंवा अज्ञात ठिकाणी टोल आकारणी शोधावी. गुगल युजर्सना अनेक फीचर्स देते. इतकंच नाही तर यूजर्सना गुगलकडून दोन ठिकाणांदरम्यान फ्लाइट सर्च करण्याचा पर्यायही दिला जातो.युजर्सना त्यांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यात मदत करण्यासाठी Google Travel सर्च इंजिन उपलब्ध आहे. ज्यामध्ये एअरलाइन तिकिटाची किंमत, त्याचे नोटीफिकेशन यांचा समावेश आहे. तर गुगल ट्रॅव्हल एक्सप्लोर टूलसह, शेजारचे हॉटेल्स शोधण्यासाठी, विविध फिल्टर अंतर्गत पर्याय देखील असेल. वेबसाइटमध्ये डेस्टिनेशन इनसाइट्स टूल, हॉटेल इनसाइट्स टूल आणि ट्रॅव्हल अॅनालिटिक्स सेंटर समाविष्ट आहे.