या सेवेसाठी दुकानदारांना एक स्मार्टफोन आणि बायोमॅट्रिक स्कॅनर मशिन बसवणे बंधनकारक आहे. जर संबंधित दुकानदाराकडे फिंगरप्रिंट सेंसरचा मोबाईल असेल, तर त्या दुकानदाराला बायोमॅट्रिक स्कॅनर बसवण्याची आवश्यकता नाही.
कसे असेल हे अॅप?
- या नव्या अॅपला यूआयडी, आयडीएफसी बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयने विकसित केले आहे.
- हे अॅप वापरासाठी दुकानदार आणि ग्राहकाला हे अॅप आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असून, हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल.
- या अॅपच्या वापरासाठी तुमचा आधार नंबर आणि बँकचे नाव अॅपमध्ये नोंद करणे गरजेचे असेल.
- यानंतर मोबाईल हॅण्डसेटच्या बायोमॅट्रिक स्कॅनरच्या माध्यमातून आपला अंगठा स्कॅन करावा.
- तुमच्या अंगठ्याचा ठसाच तुमची ओळख असेल, आणि या माध्यमातूनच तुम्ही तुमचे व्यवहार करु शकाल.
- विशेष म्हणजे, यासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.
यामुळे तुम्हाला डिजिटल व्यवहारासाठी तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडीट कार्टची गरज नसेल. शिवाय तुम्हाला तुमचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर देण्याची गरज नसेल.