मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलीकॉम कंपनी आयडिया सेल्युलरनं मुंबईसहित देशभरात 4जी सेवा सुरु केली आहे. यासोबतच आयडियानं यूजर्ससाठी एक चांगली ऑफरही आणली आहे. कंपनीनं आपल्या यूजर्ससाठी 10 जीबी 4जी डेटा मोफत देणार आहे. तसेच नव्या यूजर्सलाही तीन महिन्यांपर्यंत 10 जीबी डेटा देणार आहे.
आयडियानं जाहीर केलं आहे की, ही सेवा 2100 मेगाहर्त्झ स्पेक्ट्रम बॅण्डमध्ये आहे आणि सध्या मुंबई सर्कलमध्ये 44 लाख ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीच्या या नव्या ऑफरमुळे आयडियाच्या अनेक ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
आयडियानं आपल्या 20 सर्कलमध्ये 4जी सेवा सुरु केली आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आयडियानं ही नवी ऑफर आणली आहे. त्यामुळे आता ग्राहक आयडियाला पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.