मुंबई: चीनी मोबाइल कंपनी शाओमीनं आज आपला नवा स्मार्टफोन Mi Max 2 लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन कंपनीनं चीनमध्ये लाँच केला आहे. मात्र, भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच करण्यात येणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
Mi Max 2 मध्ये दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 64 जीबी मॉडेलची किंमत 1,699 युआन (16,000 रुपये) आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 1,999 युआन (19,000 रुपये) आहे. 1 जूनपासून हा स्मार्टफोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
शाओमी Mi Max 2 स्मार्टफोनचे खास फीचर:
6.44 इंच स्क्रिन, रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल
2GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर, 4 जीबी रॅम
बॅक फिंगर प्रिंट सेन्सर
अँड्रॉईड नॉगट 7.0 ओएस
12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ड्युल एलईडी फ्लॅश, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
5300 mAh बॅटरी