मुंबई : मोबाईल इंटरनेटचा वापर न करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बुधवारी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी आयडियाने 'सर्वांसाठी इंटरनेट' या नव्या योजनेची सुरूवात केली आहे.

 

ज्यामुळे आयडीयाचे प्रीपेड ग्राहकधारक, किरकोळ विक्रेते मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या मोबाईल यूजर्सना एक महिन्यांसाठी १०० एमबी डेटा फ्रीमध्ये वापरण्यास देऊ शकतील. ही सेवा मिळवण्यासाठी आयडिया ग्राहकांना *756# डाइल करून किंवा 56756 वर IF एसएमएस करून याचा लाभ घेता येऊ शकेल.

 

आयडिया सेल्यूसरच मुख्य अधिकारी शशिशंकर यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ''इंटरनेट वापराला वाढवण्यासाठी आम्ही ही योजना राबवित असून यामार्फत मोबाइल इंटरनेट न वापरणाऱ्या आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसाठी ही सेवा उपलब्ध करून देता येऊ शकते.''

 

हे नोटिफिकेशन डाटा ट्रान्सफर करणाऱ्यांसाठीही वापरता येऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या डेटा पैकी किती डाटा संबंधित यूजरने वापरला आहे याची माहितीही त्यांना देण्यात येणार आहे.