आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ही घोषणा केली आहे. या विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या कंपनीत तब्बल 40 कोटी ग्राहक असणार आहेत. नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत व्होडाफोनची 45.1 टक्के भागीदारी असेल तर आयडियाची 26 टक्के भागीदारी असणार आहे.
उर्वरित 35 टक्के बाजारातले इतर भागीदार असतील. रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातल्या या दिग्गज कंपन्या एकवटल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी व्होडाफोनने आपल्या 4G इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
विलिनीकरणानंतर काय होणार?
- नवी कंपनी टेलिकॉम सेक्टरमध्ये देशातली सर्वात मोठी कंपनी होणार.
- कंपनीचा बाजारहिस्सा 37 टक्क्यांपर्यंत जाईल. एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर ढकलली जाणार.
- कंपनीत व्होडाफोनचा हिस्सा 45.1 टक्के तर आयडियाचा हिस्सा 26 टक्के
- कुमारमंगलम् बिर्ला कंपनीचे नवे चेअरमन होण्याची शक्यता
- नव्या कंपनीचा सीईओ आयडियाचा आणि सीएफओ व्होडाफोनचा
- आयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणामुळे 1 लाख कर्मचारी रोजगाराला मुकण्याची भीती
- नव्या कंपनीसाठी आयडिया आणि व्होडाफोनच्या सुरू असललेल्या पायभूत सुविधा वापरल्या जाणार
- या बदलामुळे मोबाईल कंपन्यांमध्ये नव्याने कॉलदर युद्ध सुरू होऊन ग्राहकांना फायदा होणार, की कंपन्या आपापसात तडजोड करून हे युद्धच संपवणार याकडे सर्वांचं लक्ष