नवी दिल्लीः आयडीयाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीयाने 2G, 3G, आणि  4G इंटरनेट पॅकच्या दरात कपात केली आहे. नवीन दर देशभरात आज मध्यरात्रीपासून लागू होतील.


 

 

आयडीयाच्या 1 जीबी पेक्षा कमी नेटपॅकमध्ये 45 टक्क्यांपर्यंत जास्त डाटा मिळणार आहे, असं आयडीयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. आयडीया सध्या 225 रुपयांच्या दरात ग्राहकांसाठी नेटपॅक देते.

 

 

प्रत्येक वापरकर्त्यांला इंटरनेटचा लाभ घेता यावा, त्यामुळे ही दर कपात आहे. या दर कपातीमुळे ग्राहक वाढण्यास मदत होईल, असं आयडीयाचे मुख्य मार्केटींग अधिकारी शशी शंकर यांनी सांगितलं.

 

 

यापूर्वी 19 रुपयांत 75 एमबी 2G डाटा तीन दिवसांसाठी मिळत होता. नवीन दरांनुसार 110 एमबी डाटा मिळणार आहे. 3G आणि 4G नेटपॅक्सच्या दरातही अशीच कपात करण्यात आली आहे, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं.