मुंबई: ऑटो बाजारातील वाढती स्पर्धा पाहता मारुती सुझुकीनं स्विफ्ट हॅचबॅकचं लिमटेड एडिशन डीएलएक्स लाँच केली आहे. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 4.54 लाख आहे तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 5.95 लाख आहे.
डीएलएक्स, स्विफ्टच्या लोअर व्हेरिएंटच्या एलएक्सआय आणि एलडीआयच्या बेसवर आहे. पण या नव्या व्हेरिएंटमध्ये कमी किंमतीत जास्त फीचर्स असणारी कार उपलब्ध करुन देण्याचा मारुतीचा सुझुकीचा मानस आहे.
नुकत्यात आलेल्या एका सेल्स रिपोर्टनुसार, मारुती स्विफ्टच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. जून महिन्यातील टॉप 5 सेलिंग यादीतून बाहेर गेली आहे. यादीमध्ये ह्युंदाईची ग्रँण्ड आय 10 ला चौथं स्थान मिळालं आहे तर रेनॉल्टच्या क्विडला पाचवं स्थान मिळालं आहे.
फीचर्सचा विचार करता यामध्ये सोनीचं म्युझिक सिस्टम, ब्ल्यूटूथ, यूएसएबी आणि एफएम सपोर्ट आहे. तसंच पॉवर विंडो आणि फॉग लॅम्पही आहे.
या कारच्या इंजनमध्ये काहाही बदल करण्यात आलेला नाही. याच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये 1.2 लीटरचं के-सीरीज इंजन आहे.
(सौजन्य: कार देखो डॉट कॉम)