मुंबई : ह्युंदाईनं आपली नवी वेरना कार काही दिवसांपूर्वीच लाँच केली असून आतापर्यंत या कारला 7000 बुकींग मिळालं आहे. जास्त बुकींग झाल्यानं सध्या वेरनाचे काही व्हेरिएंट वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.


या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाख ते 12.39 लाख (एक्स शोरुम) आहे. कंपनीच्या मते, दिवाळीच्या आधी जवळजवळ 10,000 ग्राहकांना नवी वेरना कार मिळेल.



ही कारमध्ये 1.6 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. दरम्यान, अशीही चर्चा आहे की, या कारची किंमत कमीही होऊ शकते.

बातमी सौजन्य : cardekho.com