मुंबई : जागतिक बाजारात अॅपलला मोठा धक्का बसला आहे. नव्या रिपोर्टनुसार आता चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी हुवाईनं अॅपलला पाठी टाकलं आहे. रिसर्च फर्म Counterpointच्या रिपोर्टनुसार, जून महिन्यात विक्रीच्या बाबतीत हुवाईनं अॅपलला मागे टाकलं. याआधी अॅपल कंपनी जगात दुसऱ्या स्थानावर होती. तर सॅमसंग आजही पहिल्या स्थानावर कायम आहे.


Counterpointच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ऑगस्ट महिना चीनी मोबाइल कंपन्यांसाठी चांगला ठरु शकतो. त्यामुळे पहिल्या स्थानावरील सॅमसंगला देखील आता जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे.

Counterpointचे संचालक पीटर रिचर्जसन यांच्या मते, 'दुसरा क्रमांक पटकावणं हे हुवाईचं मोठं यश आहे. कंपनीची गुंतवणूक आणि मेहनतीचं हे फळ आहे.'

या यादीत सध्या द. कोरियाची कंपनी सॅमसंग ही पहिल्या स्थानावर आहे तर हुवाई दुसऱ्या आणि अॅपल तिसऱ्या क्रमांकावर आहे.