नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांवर आता सेवा कर लागणार नाही. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.


ोसध्या अशा ट्रान्झॅक्शनवर 15 टक्के सेवाकर द्यावा लागतो. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा निर्णयाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर या महिन्याच्या 'मन की बात'मध्ये  भारताला 'कॅशलेस सोसायटी' बनवण्याचं आवाहन केलं होतं.

आता याचाच एक भाग म्हणून 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर सेवाकर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 2000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपीची गरज नसल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं.