मुंबई : हुवाई या स्मार्टफोन कंपनीने आपले बहुप्रतीक्षित P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन लॉन्च केले आहेत. आकर्षक फीचर्सनी भरगच्च फोन सध्या अमेझॉन आणि क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.
हुवाईने भारतात P30 Pro आणि P30 Lite हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. P30 Pro ची किंमत 71, 990 ठेवण्यात आली आहे, तर P30 Lite या फोनची किंमत 19,990 रुपये आहे. P30 lite हे P30 Pro फोनचंच लोअर व्हर्जन आहे.
कंपनीने या दोन्ही फोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. ज्यात 18 महिन्यांपर्य़ंत नो कॉस्ट ईएमआय आणि 5 टक्के कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा समावेश आहे. या ऑफर्स फक्त अमेझॉन आणि क्रोमा स्टोअरमध्येच उपलब्ध असतील. तसंच 2000 रुपये जास्त देऊन 15,990 रुपयांचं हुवाई वॉचही ग्राहकांना मिळवता येणार आहे.
P30 Pro चे फीचर्स
प्रोसेसर : Kirin 980 processor
रॅम 8 GB RAM
बॅटरी 4,200mAh
मेमरी 256GB इंटर्नल मेमरी
कॅमेरा 40MP प्रायमरी कॅमेरा आणि 20MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सोबतच 32 MP सेल्फी कॅमेरा
डिस्प्ले 6.47 इंच OLED डिस्प्ले
ऑपरेटिंग सिस्टीम Android Pie
P30 Lite चे फीचर्स
P30 Lite फोन मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्येही भरगच्च फीचर्स देण्यात आले आहेत.
प्रोसेसर : Kirin 710 processor
रॅम 4 GB RAM
बॅटरी 3,340mAh
मेमरी 128 GB इंटर्नल मेमरी
कॅमेरा 24 MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सोबतच 32 MP सेल्फी कॅमेरा
डिस्प्ले 6.15 इंच FHD+ LCD डिस्प्ले
ऑपरेटिंग सिस्टीम Android Pie
दोन्ही फोनना QuickCharge फीचर देण्यात आलं आहे. तसंच या फोनना Type-C USB पोर्ट देण्यात आला आहे
40 मेगापिक्सेल कॅमेरा, 256 GB मेमरी, 8 जीबी रॅम, हुवाईचे P30 Pro आणि P30 Lite भारतात लॉन्च
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2019 05:33 PM (IST)
हुवाई या स्मार्टफोन कंपनीने आपले बहुप्रतीक्षित P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -