नवी दिल्ली : एचटीसी स्मार्टफोनचा स्वत:चा असा एक यूझर वर्ग आहे. हँडसेटमधील हटके फीचर्समुळे प्रसिद्ध असलेल्या एचटीसीच्या नव्या स्मार्टफोनची उत्सुकता कायमच असते. तशीच उत्सुकता 'HTC U' स्मार्टफोनची होती. मात्र, आता उत्सुकता संपली आहे.


'HTC U' स्मार्टफोन 16 मे रोजी लॉन्च होणार आहे. या हँडसेटमध्ये हटके फीचर्स असतील, असे संकेत एचटीसी कंपनीकडून देण्यात आले आहेत.

एचटीसीने ट्विटरवर रिलीज केलेलं टीझर पाहिल्यास लक्षात येतं की, एचटीसी यू स्मार्टफोनमध्ये एज सेन्सर असणार आहे.

एचटीसी यू स्मार्टफोन रिलीज व्हायला अजून 20 ते 25 दिवस आहेत. मात्र, आतापासूनच फीचर्सबाबत तर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. फीचर्स लीक झाल्याच्या नावाखाली अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे या स्मार्टफोनच्या पृष्ठभागावर डिस्प्ले फ्रेम सेन्सर असेल. या टच सेन्सिटिव्ह फ्रेमच्या मदतीने यूझर्स व्हॅल्युम कमी-जास्त करु शकतात. शिवाय, अॅप अॅक्सेसही करता येणार आहे. एचटीसी यू हा एकही बटन नसलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल, अशीही चर्चा आहे.

https://twitter.com/htc/status/854937689354772480

काही रिपोर्टनुसार या स्मार्टफोनचे फीचर्स पुढीलप्रमाणे असतील:

- 5.5 इंचाचा स्क्रीन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट
- 4 जीबी / 6 जीबी रॅम व्हेरिएंट
- 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट
- 16 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी