मुंबई: तैवानी कंपनी HTC नं 2016 मधील आपला सर्वात जबरदस्त स्मार्टफोन HTC 10 लाँच केला आहे. HTC 10 आणि HTC 10 लाइफस्टाइल हे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत.

 

HTC इंडियाच्या वेबसाइटवर HTC 10 लाइफस्टाइल लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 व्हेरिएंटचा HTC 10ची किंमत जवळपास 699 डॉलर (46,500 रु.) आहे.  या स्मार्टफोनची डिलिव्हरी मे महिन्यापासून सुरु होणार आहे.

 

HTC 10मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे. तसेच 2 टीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. तर HTC 10 लाइफस्टाइलमध्ये 3 जीबी रॅम असणार आहे.

 

HTC 10 मध्ये 5.2 इंच QHD डिस्प्ले असणार असून यामध्ये रेझ्युलेशन 1440x2560 पिक्सल आहे. तर HTC 10मध्ये 2.2Ghz क्वॉडकोअर स्नॅपड्रॅगन 820 आहे. तर HTC 10 लाइफस्टाइलमध्ये 1.8 Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आहे.

 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो सपोर्ट आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 अल्ट्रापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

 

4जी, 3जी, ब्ल्यूटूथ आणि डीएलएनए हे फीचर देण्यात आले आहेत.