अॅपलची धमाकेदार ऑफर, अवघ्या रु. 999मध्ये आयफोन!
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2016 10:52 AM (IST)
मुंबई: जगभरात प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन कंपनी अॅपलनं आता आपलं लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवलं आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेचा विचार करुन काही दिवसांपूर्वीच आयफोन SE हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता. आता हाच स्मार्टफोन 999 रुपयांच्या ईएमआयवरही मिळणार आहे. दोन वर्षापर्यंत 999 रुपयांच्या हप्त्यांवर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. याआधी आयफोन 6 आणि आयफोन 6s साठी लीजिंग प्लान आणला होता. या प्लाननुसार, आयफोन 6साठी दोन वर्ष 1199 रु. ईएमआय आणि आयफोन 6S साठी दोन वर्ष 1,399 ईएमआय असणार आहे. कंपनीने आयपॅड मॉडेल्सवरही ऑफर सुरु आहेत. ईएमआयवर स्मार्टफोन विक्री यावर यंदा अॅपलनं जोर दिला आहे. 8 एप्रिलला भारतात लाँच करण्यात आलेल्या आयफोन SE बाबत मार्केटमध्ये म्हणावा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. यासाठीच ही नवी ऑफर आणल्याचं समजतं आहे.