मुंबई: सणासुदीचा मुहुर्तावर HP इंकनं भारतीय ग्राहकांना आपल्या काही निवडक उत्पादनांवर सूट दिली आहे. एचपी एनव्ही आणि पवेलियन मॉडेलच्या लॅपटॉप खरेदीवर रु. 5,999 ची अतिरिक्त ऑनसाइट वॉरंटी आणि एक वर्षाचा बर्गलरी आणि थेफ्ट इंश्युरन्स देण्यात येणार आहे. तसेच 999 रुपयात मॅकेफीचं इंटरनेट सिक्युरिटी सब्स्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 4,999 रुपये किंमतीची HPची एक टीबीची एक्सटर्नल हार्ड डिस्क 1,999 रु. मिळेल.

HP इंकच्या पर्सनल सिस्टमचे संचालक केतन पटेल यांनी सांगितलं की, 'या सणाच्या काळामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी लेटेस्ट जनरेशनच्या एचपी नोटबुक आणि डेस्कटॉपवर एक खास ऑफर देत आहोत.'

ग्राहक शॉपर्स स्टॉपच्या रु. 4000 किंमतीचं गिफ्ट वॉउचर, किंवा रु. 1,999 ब्ल्यूटूथ स्पीकर किंवा रु. 1,999 हेडसेट यापैकी काहीही एक घेऊ शकतं. ही ऑफर सहा नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.