मुंबई: भारतीय बाजारात रेनॉल्टच्या क्विड कारची बरीच चर्चा आहे. सध्या या कारला बरीच मागणी आहे. पण आता रेनॉल्टनं आपली या कार (रिकॉल) परत बोलावल्या आहेत.


18 मे 2016 पर्यंत तयार झालेल्या 799 सीसी इंजिनच्या क्विड कारमध्ये फ्यूएल हॉजमध्ये क्लिप लावणं बाकी आहे. याच्या फ्यूएल सिस्टीमची चाचणी केली जाणार आहे. इंजिनला होणाऱ्या फ्यूएल सप्लायमध्ये कोणता अडथळा तर नाही ना याची चाचणी केली जाणार आहे.


या रिकॉलसाठी रेनॉल्ट डिलरशीपनं क्विड ग्राहकांशी संपर्क करणं सुरु केलं आहे. क्लिप लावणं आणि फ्यूएल सिस्टम चाचणी करणं हे निशुल्क असणार आहे.

क्विडमध्ये आता दोन इंजिन पर्याय उपलब्ध असणार आहे. पहिल्या मॉडेलमध्ये 799 सीसीचं इंजिन असणार आहे. तर नुकतंच 1.0 लीटरचं 999 सीसी इंजिन कार लाँच केली आहे.

800 सीसी इंजिन क्विड कारची किंमत रु. 2.65 लाख ते रु. 3.74 लाखापर्यंत असणार आहे. तर क्विड 1.0च्या इंजिन कारची किंमत 3.83 लाख ते 3.96 लाख आहे.

सोर्स: कार देखो डॉट कॉम

Source: cardekho.com