मुंबई : तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.

 

ब्लॉक केलेलं कसं ओळखावं?

- सर्वात आधी तुम्हाला मित्राचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस दिसतं की नाही हे एकदा चेक करा.

- जर दिसत नसेल तर समजा की, तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

- दुसरी पद्धत अशी आहे की, व्हॉट्सअॅपवर फ्रेण्डला मेसेज पाठवला असेल आणि केवळ एकच टिक दिसलं, याचा अर्थ असा की मेसेज सेंड झाला आहे, पण डिलिव्हर झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

 

आवश्यक प्रश्न

 

1. ही ट्रिक प्रत्येकवेळी काम करेल?

उत्तर : स्वत:ला अनब्लॉक करण्याच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपचा बॅकअप मिळणार नाही. जर तुम्ही बॅकअप केलं, तर अनब्लॉग होऊ शकणार नाही.

 

2. ही ट्रिक आयफोनमध्येही काम करेल?

उत्तर- नाही, ही ट्रिक फक्त अँड्रॉईड फोनसाठी आहे. याशिवाय सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण डेटा अप क्लिअर करत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये ही ट्रिक काम करणार नाही.

 

3. डेटा क्लिअर करणं आवश्यक का?

उत्तर : व्हॉट्सअपचा डेटा वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह होतो. एक फोल्डर फोन मेमरीमध्ये तर एक मेमरी कार्डमध्ये. दोन्हीपैकी एका ठिकाणीही डेटा राहिला तर अडचणीचं ठरु शकतं.

 

  1. फोटोही डिलीट होतील?


उत्तर : नाही, व्हॉट्सअपचे फोटो डिलीट होणार नाही. केवळ मेसेज चॅट हिस्ट्री डिलीट होईल. फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे व्हॉट्सअप अकाऊंट डिलीट केल्याने त्यावर परिणाम होत नाही.

 

 

स्वत:ला अनब्लॉक कसं कराल?

 

स्टेप  1 व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप कर. Settings>Account>Delete my account

 

स्टेप 2 :  आता तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा

 

स्टेप 3 : यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा

 

स्टेप 4 : व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा

 

स्टेप 5 : आता प्ले स्टोअरमधून पुन्हा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स फॉलो करा. तुमचा नंबर टाका

 

स्टेप 6 : ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.