मुंबई : जर तुमचा सॅमसंग मोबाईल खूपच स्लो झाला असेल, खूपच धीम्या गतीने चालत असेल, तर त्यासाठी फॅक्टरी रिसेट हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
तुमच्याकडे जर सॅमसंग गॅलेक्सी एस-6 किंवा एस-6 एज असेल, तर तो फॅक्टरी रिसेट कसा करायचा याबाबतच्या काही टिप्स
फॅक्टरी रिसेट म्हणजे काय?
फॅक्टरी रिसेट म्हणजे, ज्यावेळी तुम्ही फोन खरेदी केल्यानंतर बॉक्समधून बाहेर काढता, म्हणजे त्यामध्ये काहीही डेटा नसतो, त्या स्थितीत फोन नेणे.
फॅक्टरी रिसेटमुळे तुमच्या फोनमधील सर्व डेटा, जसे फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट्स सर्व काही नष्ट होतं. त्यामुळे फोन फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी तुमचा संपूर्ण डेटा सेव करून ठेवा.
डेटा सेव केल्यानंतर सॉफ्ट रिसेट करणं सोपं आहे.
फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी स्क्रीनवर तुम्हाला इशारा येईल, की तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. त्यावेळी तुम्ही ओके केलात, तर फोन फॅक्टरी रिसेट मोडमध्ये जाईल.
हार्ड रिसेट
जर तुम्ही फोनचा पासवर्ड विसरला असाल, तर हार्ड रिसेटशिवाय कोणताच पर्याय नाही.
सर्वात आधी फोन बंद करा. त्यानंतर आवाजाचं, होम आणि स्विच ऑफ बटण एकाचवेळी दाबा. काही सेकंदात अँड्रॉईड रोबोट मोबाईलच्या स्क्रीनवर येईल.
थोड्या वेळात फोनचा बूट मेन्यू वापरुन फॅक्ट्री रिसेट करु शकता.
फॅक्टरी रिसेट करताना सर्व डेटा नष्ट होणार असतो. त्यामुळे तो पर्याय निवडावा लागतो.
एकदा का फॅक्टरी रिसेट झालं, त्यानंतर तुम्ही पॉवर बटण वापरून फोन रिस्टार्ट करु शकता.