मुंबई : मोबाईल फोनवर आलेल्या एखाद्या लिंकवर आपण चुकून क्लिक करतो आणि त्याचा परिणाम फंक्शनवर होतो. याचं कारण म्हणजे फोनमध्ये व्हायरसची एन्ट्री होणं. खरंतर फोनमध्ये व्हायरस शोधणं फार सोपं आहे. व्हायरस वेळेवर कसा शोधायचा आणि त्यानुसार तातडीने कोणता उपाय करायचा, काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.


हॅकर्सद्वारे मोबाईल फोन वारंवार लक्ष्य केले जातात. पण काळजी करु नका, मोबाईल फोनमध्ये व्हायरस असल्याची लक्षणे कोणती हे जाणून घेणं सोपं आहे.


तुमच्या फोनमध्ये व्हायरस असल्याचे संकेत 



  • 1. मोबाईल डेटाचा लक्षणीय वापर

  • 2. फोन जास्त गरम होणे

  • 3. बॅटरीचे आयुष्य कमी होणे

  • 4. अॅप्स सातत्याने क्रॅश होणे किंवा हळू उघडणे किंवा अजिबातच न उघडणे

  • 5. तुमचा फोन स्लो होणे

  • 6. वारंवार पॉप-अप येणे

  • 7. अज्ञात अॅप्स इन्स्टॉल होणे


तुमचा फोनमध्ये वर सांगल्याप्रमाणे काही काही लक्षणे दिसत असल्यास मालवेअर असल्याची शक्यता आहे


फोनमधून व्हायरस काढून टाकणे



  • 1. लक्षणे दिसताच तुमच्या फोनमधून नको असलेले अॅप्स काढून टाका

  • 2. फोनमध्ये अँटिव्हायरस सॉफ्टवेअर (सशुल्क) टाका.

  • 3. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन पूर्णपणे स्कॅन करा.

  • 4. तुमच्या संपूर्ण डेटाचा बॅकअप घ्या आणि फॅक्टरी रिसेट करा.


ही खबरदारी अवश्य घ्या



  • 1. अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरशिवाय तुमच्या फोनमध्ये कोणतंही सॉफ्टवेअर कधीही डाऊनलोड करु नका.

  • 2. सार्वजनिक वाय-फाय वापरणं टाळा.

  • 3. एसएमएस, ई-मेल आणि इतर माध्यमातून शेअर केलेल्या नको असलेल्या लिंकवर क्लिक करु नका.

  • 4. कोणत्याही सोर्सवरुन कोणतंही फ्रीवेअर डाऊनलोड करणं टाळा.

  • 5. तुमचा फोन दुसऱ्याच्या हातात देणं टाळा.

  • 6. तुमचा फोन कायम अधिकृत सर्विह सेंटरमध्येच दुरुस्त करा.

  • 7. तुमच्या फोनवर लॉक ठेवा.

  • 8. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन करुन सर्व बँकिंग अॅप्स सुरक्षित ठेवा