आजकाल बहुतेक लोक Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडिया साइटवर उपलब्ध असतात. 2010 साली आलेलं इन्स्टाग्राम हे अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. जगातील कोट्यावधी लोक हे व्यासपीठ वापरत आहेत. आपण सर्वजण आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत करतो. बरेच वापरकर्ते येथे नेहमीच ऑनलाइन असतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? की आपण इन्स्टाग्रामवरुन पैसेदेखील कमवू शकतो?


क्रिकेटर विराट कोहलीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी इन्स्टाग्रामवरून लाखो रुपये कमवले आहेत. इन्स्टाग्राम व्यवसाय खात्यासह बर्‍याच सेवा प्रदान करते. आज आम्ही सांगणार आहोत की आपण इन्स्टाग्रामवर business account कसे उघडायचे आणि त्यामधून आपण चांगली कमाई कशी करू शकता.


Instagram बिजनेस प्रोफाइल काय आहे?
इंस्टाग्राम एक पूर्णपणे विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे. आपण येथे आपले business account तयार करुन इन्स्टाग्राम पेजवर जाहिरात करू शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता. याव्यतिरिक्त आपले followers ऑनलाईन कधी असतात, त्यांचा देश आणि शहर कोणते, हे देखील समजते. आपली कोणती पोस्ट किती लोकांनी पाहिली आणि किती impression आले याबद्दल आपल्याला माहिती देखील मिळेल. यासह आपला व्यवसाय बराच सुधारू शकतो. आपण आपल्या इंस्टाग्राम व्यवसाय खात्यातून पैसे कमवू शकता.


Instagram बिजनेस अकाउंट कसे उघडायचे?

  • सर्वात अगोदर Instagram open करा. तुमच्या समोर एक पेज येईल जिथे sign up करा किंवा log in करा असे लिहले असेल.

  •  येथे आपल्याला फोन नंबर आणि email मागितला जाईल. आपण डिटेल भरुन next वर click करा.

  • आता आपल्याला नाव आणि password विचारला जाईल, त्यानंतर next वर click करा.

  • आता आपल्याला पेज उघडल्यानंतर मित्रांची यादी दिलेल. एक तर त्यांना follow करा किंवा next वर click करा.

  • आता आपल्याला Facebook सोबत connect करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला करायचे असेल तर करा अथवा skip वर click करा.

  •  त्यानंतर फोटो add करण्याचा पर्याय येईल. तुम्ही फोटो add करा अथाव skip वर click करा.

  •  आता login info ला सेव करण्यासाठी सांगितले जाईल, सेव किंवा skip वर click करा.

  •  तुमचे Instagram account तयार झालेले असेल आता याला business account मध्ये बदलायचे आहे.

  •  आपल्या येथे तीन बिंदु दिसतील त्यावर click करा.

  •  त्यानंतर switch to business account वर click करा. त्यानंतर continue वर click करा.

  •  इथं आपल्या account ची category निवडा आणि next click करा.

  •  आपली माहिती पाहा आणि next वर click करा.

  •  आपले Facebook page निवडा किंवा skip वर click करा.

  •  आता go to profile वर click करा. आता आपले account बिजनेस अकाउंट झाले आहे.


इंस्टाग्रामवर business account तयार केल्यानंतर, आपण त्यावर traffic वाढवा आणि आपल्या brand ची जाहिरात करा. याचा तुमच्या व्यवसायाला फायदा होईल. आपले अधिक फॉलोअर्स असल्यास, कंपनी त्यांच्या जाहिरातीसाठी तुम्हाला संपर्क करतील.