मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी हॉनरनं आपल्या V9 चा टीझर लॉन्च केला आहे. 21 फेब्रुवारीला हा स्मार्टफोन लॉन्च होईल. हा स्मार्टफोन वॉटर रेसिस्टंट असण्याची शक्यता आहे. V8 या स्मार्टफोनच्या लोकप्रियतेमुळे जास्त फीचर देत V9 फोन लॉन्च केला जाणार आहे.

2017 मध्ये नवा फोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही मेजवानी असेल, कारण या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड नोगटसोबतच ड्यूअल कॅमेराही देण्यात आला आहे.

हॉनर V9 चे फीचर्स :

ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नोगट 7.0

रॅम : 4जीबी/6जीबी

प्रोसेसर : 2.4GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर

डिस्प्ले : 5.7 इंचाचा क्वार्ड एचडी डिस्प्ले

मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी

कॅमेरा : 12 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल ड्यूअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

बॅटरी : 3900mAh