मुंबई: या अठवड्यात लाँच होणाऱ्या हुवाई ऑनर 8साठी रजिस्ट्रेशन सुरु असून, गेल्या चार दिवसांत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्मार्टफोनसाठी गेल्या चार दिवसांत तब्बल 50 लाख जणांनी नोंदणी केली आहे. हुवाईने एक टीचर फोटोद्वारे ही माहिती दिली आहे.



18 जुलैपर्यंत नोंदणी सुरु ठेवण्यात येणार असून 19 जुलै रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

ऑनर 8 मध्ये 5.2 इंचाची फुल एचडी स्क्रिन देण्यात आली असून 1.8GHz चा Kirin 950 ऑक्टोकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा 12MP असून त्यात 2.2 चा ड्युअल फोकस अपार्चर देण्यात आला आहे. ड्यूअल अपार्चरमुळे कमी प्रकाशातही चांगला फोटो येऊ शकतो. हा स्मार्टफोन 3GB रॅम 32 GB इंटरनल स्टोअरेज आणि 4GB रॅम 64 GB इंटरनल स्टोअरेज अशा दोन व्हॉरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

 

3GB रॅम 32 GB इंटरनल स्टोअरेजच्या स्मार्टफोनची किंमत CNY 1999 म्हणजे भारतीय चलनानुसार, 20,000 रुपये आहे, 4GB रॅम 32 GB इंटरनल स्टोअरेजच्या फोनची किंमत किंमत CNY 2299  म्हणजे भारतीय चलनानुसार, 23,000 रुपये आहे. तर 4GB रॅम 64 GB इंटरनल स्टोअरेजच्या स्मार्टफोमनची किंमत CNY 2499  म्हणजे भारतीय चलनानुसार, 25,000 रुपये आहे.