नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने गुरूवारी जमात-उद-दावाचा सर्वेसर्वा हफिज सईदचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. हाफीज सईदचे ट्विटर हॅण्डल @hafizsaeedlive या नावाने ऑपरेट केले जात होते.

 

सईद या अकाउंटचा वापर देशात हिंसाचार भडकवण्यासाठी करत असल्याची चिंता भारतीय सुरक्षा एजेन्सींना होती.

 

यापूर्वी हाफिजचे Hafiz Saeed@HSaeedOfficial हे आणखीन एक अकाऊंट हॅण्डल बंद करण्यात आले होते. यानंतर हाफिजने हे नवे अकाउंट सुरु केले होते.

 

हाफिज सईद मुंबईवरील 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी मोस्ट वाँटेड आहे. या दहशतवाही हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता.

 

दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी ट्विटरने चालू वर्षात 1,2,5000 ट्विटर हॅण्डल बंद केले आहेत.

 

''जगभरात जहालमतवादी संघटनांच्या सुरु असलेल्या कारवाईंनी आम्ही व्यथित असून, आम्ही दहशतवादी कारवायांसाठी ट्विटरचा आधार घेण्याचा निषेध करतो. अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करणाऱ्यांसाठी आम्ही सेवा उपलब्ध करीत नसल्याचे,'' ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.