बंगळुरू: इ-कॉमर्स मार्केटप्लेस असलेली फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात जास्त विश्वासू आणि लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंगचे प्लॅटफॉर्म बनले आहे. रेड शीर कन्सल्टिंगने केलेल्या एका सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. 'द इंडियन लीडरशिप इंडेक्स'च्या नावे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 3000 हून आधिक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. तसेच फ्लिपकार्टच्या 6000 उपभोगत्यांच्या अनुभवांवर आधारीत हे सर्वेक्षण असल्याचे सांगण्यात आले.

 

या सर्वेक्षणात फ्लिपकार्ट अव्वल स्थानी असून, यानंतर अमेझॉन, स्नॅपडील, पेटीएम आणि शॉपक्लूज यांचा क्रमांक आहे. फ्लिपकार्टने व्हॅल्यू फॉर मनी या श्रेणीतही अव्वल स्थान पटकावले आहे. ग्राहकांना सहकार्य, परत घेण्याची सुविधा, रिफंड अॅन्ड रिव्हर्स पिकअप आदीसाठीही फ्लिपकार्टला सर्वांनीच पसंती दिली आहे.

 

या वर्षी फ्लिपकार्टच्या रिजिस्टर केलेल्या ग्राहकांची संख्या ७.५ कोटीहून अधिक पोहचली आहे. हा टप्पा गाठणारी अमेरिका आणि चीनबाहेरील पहिली कंपनी ठरली आहे.