मुंबई : कोरोना व्हायरसच प्रसा होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती . सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी टीका देखील केली. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास काही प्रमाणात मदत झाली. परंतु लॉकडाऊनमुळे लोकं घरात अडकले असले, तरी मानवाचा व्यक्त होण्याचा स्वभाव मात्र कायम आहे. लोकांना बाहेर पडता येत नाही, मित्रांसोबत गप्पा मारता येत नाही, यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी पर्याय शोधला आहे. यामध्ये Whatsapp, Zoom, CultFit, Airtel, Zomato आणि Swiggy या सारख्या अॅपमुळे अनेक काम सोपी झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचा वापर केला जात असून व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अगदी सहज एकमेकांशी कनेक्ट होता येतं. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांना आपल्या घरातच राहावं लागतंय. पण अशावेळी आपल्या लोकांची आठवण येते आणि सर्वांसोबत फोनवर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलण होतं. एकाचवेळी अनेकांना व्हिडिओ कॉल करणं सध्या सुरू आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर एकाचवेळी आपण चार जणांना ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकतो.
Zoom
लॉकडाऊनमुळे ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत. झूम एक फ्री एचडी मीटिंग अॅप आहे. या अॅपवरून युजर एकाचवेळी जास्तीत जास्त 100 लोकांसोबत बोलू शकतात. अॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि 40 मिनिटांची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे. तसेच लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून झूम ऑनलाईन क्लासेसला चालना मिळू लागली आहे. कोरोनाच्या या संकटात वर्गात जावून शिकणं शक्य नाही, पण आता झूम अॅपच्या मदतीनं ऑनलाईन क्लासेसकडे विद्यार्थी वळाले आहेत. योगासने, पाककला, व्यायाम, सजावट आणि गाणे-संगीताची मैफील झूममुळे शक्य झाल्या आहेत.
Cult.Fit
कोरोना व्हायरसपासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा, यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण दिवस घरीच रहावं लागत असल्यानं लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी याबाबत cult. Fit हे अॅप आणले आहे.
Airtel
Whatsapp, Zoom आणि CultFit हे अॅप वापरण्यासाठी हाय स्पीड इंटरनेटची आवश्यकता आहे. एअरटेलने देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात सेवा पुरविल्या आहे. आजही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहे की, जे रिचार्जसाठी आजही दुकानांवर अवलंबून आहेत. या ग्राहकांची गैसयोय होऊ नये यासाठी Airtel ने एटीएम, मेडिकल आणि पोस्ट ऑफिसवर देखील मोबाईल रिचार्जची सेवा उपलब्ध केली आहे. तसेच Airtel Thanks अॅपच्या माध्यमातून कोणत्याही नेटवर्कवर रिचार्ज करणे शक्य आहे. यासाठी लोकांना मदत करणाऱ्या ग्राहकांना 4 टक्के कॅशबॅक देखील देण्यात आला. एअरटेल थँक्स अॅप कामाची गोष्ट आहे. घरबसल्या रिचार्ज करणं एअरटेलमुळे सहज शक्य झालं आहे. या अॅपच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांची मदत देखील करता येणार आहे.
Zomato and Swiggy
देशात आॅनलाइन फूड मागविण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून फूड डिलिव्हरी क्षेत्राची प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये स्विगी आणि झोमॅटोची मोठी मदत झाली. ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील लॉकडाऊनच्या काळात केला आहे.