टेलिग्राम आता हॅकर्सचे नवीन हत्यार बनत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हॅकर्स फेसबुक वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यासाठी ते टेलिग्राम अ‍ॅप बॉट वापरत आहेत.


असे म्हटले जात आहे की दोन वर्षांपूर्वी डेटा उल्लंघन करताना ज्या वापरकर्त्यांचा डेटा हॅकर्सनी पकडला होता त्यांनाच लक्ष्य केले जात आहे.


WhatsApp, Amazon पाठोपाठ Airtelच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा करा वापर


2019 मध्ये एका संशोधकाने असुरक्षित सर्व्हरचा शोध लावला होता. या सर्व्हरवर सुमारे 42 कोटी रेकॉर्ड होते. या रेकॉर्डमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील 150 कोटी वापरकर्त्यांचा डेटाही होता. असं म्हटलं जायंत की हॅकर्सनी यासाठी टेलिग्राम अ‍ॅप बॉटचा वापर केला. जेणेकरुन ते फेसबुक वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये सहज प्रवेश करू शकतील.


कशी होते हॅकींग
हा बॉट यूजर्सला फेसबुक यूजर आयडी ऐवजी हुशारीने फोन नंबर एंटर करण्यास सांगतो. 'रिव्हर्स सर्च' ट्रिकद्वारे फेसबुक आयडीच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा फोन नंबर मिळवतात. तज्ञांचे मत आहे की 4 कोटींहून अधिक वापरकर्त्यांचा डेटा असुरक्षित डेटाबेसचा भाग झाला आहे.


आला रे आला! PUB-G ला टक्कर द्यायला FAU-G आला; अक्षय कुमारकडून व्हिडीओ ट्वीट


असा दावा केला जात आहे की ही बॉट 19 देशांमधील वापरकर्त्यांना डेटा पुरवते. असेही सांगितले जात आहे की जे वापरकर्ते आपले नंबर खाजगी ठेवतात त्यांना हे बॉट मिळू शकत नाही.


डेटा लीकचा धोका संपल्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या फेसबुक आयडीवर ही बॉट काम करत नसल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. परंतु, 2019 पूर्वी झालेल्या खात्यांबाबत काहीही बोलले गेले नाही. अशा परिस्थितीत ही खाती हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.