नवी दिल्ली : अॅपलनंतर आता इतर स्मार्टफोन ब्रँड्सनेही जीएसटीनंतर स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. असुसने जेनफोन 3 (ZE552KL), जेनफोन 3 (ZE520KL) , जेनफोन 3 मॅक्स (ZC553KL) आणि जेनफोन 3S या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 3 हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे.
3 (ZE552KL) सध्या 16 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 19 हजार 999 रुपये होती. तर जेनफोन 3 (ZE520KL) ची किंमत सध्या 15 हजार 999 रुपये आहे. या फोनची किंमत अगोदर 17 हजार 999 रुपये होती.
जेनफोन 3 मॅक्स (ZC553KL) च्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. हा फोन सध्या 14 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे, ज्याची किंमत अगोदर 15 हजार 999 रुपये होती.
जेनफोन 3S च्या किंमतीतही दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 14 हजार 999 रुपये किंमत असलेल्या या फोनची किंमत सध्या 12 हजार 999 रुपये करण्यात आली आहे.
दरम्यान जीएसटी लागू झाल्यानंतर अॅपलनेही आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅपल वॉचच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. कारण अॅपलला 1 जुलैपूर्वी विविध प्रकारचे टॅक्स भरावे लागत होते. मात्र आता 12 टक्के जीएसटी स्लॅब आणि कस्टम ड्युटीनंतरही अॅपलवरील टॅक्स कमी झाला आहे. त्यामुळे अॅपलने भारतातील वस्तूंची किंमत कमी केली असल्याचं जाणकारांचं मत आहे.