मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये चक्रीवादळानं लोकांसोबतच चक्क रस्त्यावरची मोबाईल टॉयलेट्सही पळू लागली.

हवामानात अचानक बदलल्याने आणि पावसानंही जोर धरल्यानं लोकांनी आधीच पळापळ सुरू केली, मात्र रस्त्यावर पाणी वाढल्याने मोबाईल टॉयलेट्सही वाहत वाहत सुटले. वाऱ्याच्या वेगाने या टॉयलेट्सचा वेगही वाढला.

एकीकडे पावसापासून वाचण्यासाठी नागरिक रस्त्यावरुन पळत होते, तर दुसरीकडे रस्त्यावरील पाण्यातून मोबाईल टॉयलेट्स पुढे सरकत होते. हे टॉयलेट्सही पावसापासून बचावासाठी धावताहेत की काय असास प्रश्न उपस्थित होत होता.

https://twitter.com/EugeneDX14/status/880766195691134976