मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना जबरदस्त ऑफर दिली आहे. बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना 1 जुलैपासून 6 पट डेटा देणं सुरु केलं आहे.


प्रीपेड ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स आणल्यानंतर पोस्टपेड ग्राहकांसाठीही ही नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या कोणत्याही डेटा प्लॅनवर 6 पट डेटा मिळेल, असं बीएसएनएलने सांगितलं.

  • डेटा प्लॅन : 99 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये आता 250 एमबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये डेटा मिळत नव्हता.

  • डेटा प्लॅन : 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1 जीबी डेटा मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये केवळ 200 एमबी डेटा दिला जात होता.

  • डेटा प्लॅन : 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 3 जीबी डेटा मिळत होता, तर आता 10 जीबी डेटा मिळणार आहे.


ग्राहकांना आम्ही जास्तीत जास्त स्वस्त प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील सद्यपरिस्थिती पाहता बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ही ऑफर आणली असल्याचं कंपनीचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितलं.

बीएसएनएलने ही ऑफर जिओला टक्कर देण्यासाठी आणली आहे. बीएसएनएलचे पोस्टपेड ग्राहक जिओच्या तुलनेत जास्त आहेत. मात्र एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या कंपन्यांना ही ऑफर टक्कर देईल. एअरटेल आणि व्होडाफोनने पोस्टपेड ग्राहकांना 30 जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे.