मुंबई : अॅपल कंपनीचा बहुप्रतिक्षीत आयफोन 7 लाँच होत आहे. या लाँचिंगकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. आयफोन सेव्हनसोबतच आयपॅड, अॅपल वॉच 2, मॅकबुक एअर सिरिजमधील लॅपटॉपही लाँच होणार आहेत. मात्र सर्वाधिक उत्सुकता आहे ती आयफोन सेव्हनची. त्याच्या फिचर्सबद्दलही अनेकाविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.


 
मोबाईल फोन्सच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या अॅपलचे दोन अत्याधुनिक फोन्स लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. अॅपल सेव्हन आणि अॅपल सेव्हन प्लस अशी या फोन्सची नावं असतील. केवळ मोबाईलप्रेमीच नव्हे तर मोबाईल बनवणाऱ्या इतर कंपन्यांचंही या फोन्सकडे बारकाईनं लक्ष राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे या फोनमधील अफलातून फिचर्स

 
काय फिचर्स असण्याची शक्यता :

 
आयफोन 7 मध्ये 4.7 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले

आयफोन 7 प्लसमध्ये 5.5 इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले

आयफोन 7 मध्ये 2 जीबी तर आयफोन 7 प्लसमध्ये 3 जीबी रॅम

दोन्ही फोन्समध्ये बेसिक 32 जीबी मेमरी

256 जीबीपर्यंत एक्पांडेबल मेमरी

दोन्ही फोनना ए-10 प्रोसेसर

दोन्ही फोनना 3.5 एमएम अॅडॉप्टरचा सपोर्ट

आयफोन 6 पेक्षाही उत्तम वॉटरप्रूफिंग टेक्निक

आयफोन 7 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर

आयफोन 7 प्लसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा

आयफोन 7 च्या बाह्यरुपात फारसे बदल नाही

स्पेस ब्लॅक आणि डीप ब्लू रंगात उपलब्ध

भारतात साधारण 63 हजारांपर्यंत किंमत

फोनसोबत मिळणार वायरलेस हेडफोन

याशिवायच अॅपलचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलेल्या त्याच्या होम बटणवर फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात येणार आहे. ज्यामुळे केवळ स्पर्श करताच तुमचा फोन अनलॉक होऊ शकेल.

 
तर अशी अनेक अत्याधुनिक आणि नावीन्यपूर्ण फिचर्स घेऊन आयफोन 7 लाँच होत आहे. भारतात तो केवळ 19 दिवसांतच म्हणजे 26 सप्टेंबरपासून खरेदी करता येईल.