नवी दिल्ली : तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.


रस्ते, पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.

माहिती कशी मिळवाल?

या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पंचायत राज मंत्रालयाच्या प्लॅन प्लस या वेबसाईटशी जोडले जाल.

वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा तपशील पाहिजे, ते वर्ष टाका

त्यानंतर राज्य निवडा

राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नेमकी कशाची माहिती निवडायची आहे, तो पर्याय निवडा, जसं की ग्रामपंचायतीची माहिती हवी असेल तर ग्रामपंचायत निवडा आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद हा पर्याय आहे.

यानंतर जिल्हा निवडण्याचा पर्याय येईल

जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडावा लागेल

तालुक्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची यादी येईल.

ग्रामपंचायत निवडून गेट रिपोर्टवर क्लिक करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल

पाहा व्हिडीओ :