मुंबई : शाओमीचा ‘रेडमी नोट 5 प्रो’ खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे. उद्यापासून (13 एप्रिल) ‘रेडमी नोट 5 प्रो’ स्मार्टफोनची  mi.com वरुन प्री-ऑर्डर करता येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शाओमीने ‘रेडमी नोट 5 प्रो’ स्मार्टफोन लॉन्च केला होता.


‘रेडमी नोट 5 प्रो’ स्मार्टफोन उद्या (13 एप्रिल) दुपारी 12 वाजल्यापासून प्री-ऑर्डर सुरु होईल. एमआयच्या वेबसाईटवर कॅश ऑन डिलिव्हरीचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

फेब्रुवारीत ‘रेडमी नोट 5 प्रो’ स्मार्टफोनचे एकूण दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले होते. यामध्ये 13 हजार 999 रुपये किंमतीचा 4 जीबी व्हेरिएंट आणि 16 हजार 999 रुपये किंमतीचा 6 जीबी व्हेरिएंट अशा दोन व्हेरिएंटचा समावेश आहे.

‘रेडमी नोट 5 प्रो’चे निवडक फीचर्स :

  • 5.9 इंच एचडी स्क्रीन (1080×2160 पिक्सेल रिझॉल्युशन)

  • ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट

  • 12 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे

  • ब्युटिफाय 4.0, पोट्रेट मोडचेही कॅमेरात फीचर्स

  • 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा

  • 4000 mAh क्षमतेची बॅटरी