Gozero Skellig Lite : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये आता इलेक्ट्रिल वाहनांची मागणी वेगानं वाढली आहे. पॉप्युलर ई-बाईक ब्रँड GoZero Mobility ने आपली नवी ई-बाईक (इलेक्ट्रिक सायकल) Skellig Lite ला भारतात लॉन्च केलं आहे. हे अत्यंत स्वस्त मॉडल आहे. GoZero Skellig Lite ची किंमत केवळ 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सायकलची विक्री ऑफलाईन आणि ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासोबतच GoZero वेबसाइटवरही ही इलेक्ट्रिक सायकल विक्रिसाठी उपलब्ध असणार आहे. एवढंच नाहीतर, ही सायकल 2999 रुपयांच्या अॅडवांस पेमेंटवर प्री-बूक केली जाऊ शकते.
डिझाइन
या सायकलची डिझाइन अत्यंत मॉर्डन पद्धतीनं करण्यात आलं आहे. लोकांना हे डिझाइन आपल्याकडे आकर्षित करतं. ही सायकल ज्या पद्धतीनं डिझाइन करण्यात आली आहे, त्यामुळे शहरात राइड करणं अत्यंत सोप आहे. शहराबाहेरही ही सायकल अगदी सहज चालवता येऊ शकते.
हा आहे टॉप स्पीड
GoZero Skellig Lite इलेक्ट्रिक सायकलमध्ये मीडियम लेव्हलच्या पॅडल असिस्टसोबत 25 किलोमीटरच्या रेंजमध्ये मिळते. एवढंच नाहीतर या सायकलचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे. यामध्ये डिटिचेबल EnerDrive 210W ची लिथियम बॅटरी पॅक आणि एक 250W रियर हब-ड्राइव मोटर देण्यात आली आहे.
चार्जिंग संपल्यानंतरही करता येणार वापर
यामध्ये LED डिस्प्ले यूनिट देण्यात आलं आहे. ज्यामुळे रायडर तीन पेडल-असिस्ट पैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 2.5 तासांचा वेळ लागतो. एवढंच नाहीतर चार्जिंग संपल्यानंतर तुम्ही सामान्य सायकलप्रमाणे वापरु शकता. कंपनीनं ही दमदार सायकल लॉन्च केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aadhaar Virtual Id : अवघ्या काही मिनिटांत तयार करा आधार कार्डाचा वर्च्युअल आयडी; फॉलो करा 'या' टिप्स
- Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटर ठरली 'मोस्ट प्री-बुक्ड स्कूटर'; 24 तासांत 1 लाख ग्राहकांकडून बुकिंग
- Best CNG Cars : नवी गाडी घ्यायचीये पण, वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी हैराण? CNG कार ठरतील उत्तम पर्याय