नवी दिल्ली : जगभरात कमालीच्या प्रसिद्ध आणि सर्वाधिक वापराच्या अशा WhatsApp या मेसेजिंग अॅपकडून नव्या गोपनीयता धोरणाबबातची माहिती समोर आली आणि या अॅपबाबच अनेकांच्याच मनात संभ्रमाची परिस्थिती उभी राहिली. पाहता पाहता, या अॅपसाठी अनेक पर्यायही उभे राहिले. कित्येकांनी तर या नव्या गोपनीयता धोरणामुळं WhatsAppकडे पाठ फिरवत या पर्यायांना पसंतीही दिली.


मेसेजिंग अॅपच्या याच नव्या यादीमध्ये आता आणखी एक नाव जोडलं जात आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आणि भारत सरकारतर्फे सर्वांसाठी सेवेत आणल्या जाणाऱ्या या अॅपचं नाव आहे, (Sandes) 'संदेस'.


WhatsApp वर म्युट व्हिडीओ पाठवणं शक्य; युजर्ससाठी खास फिचर


Sandes हे अॅप तयार करण्यात आलं असून, सध्या विविध स्तरांवर त्याची चाचणी सुरु आहे. प्राथमिक स्तरावर हे अॅप सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरात असून चाचणीचे टप्पे पार केल्यानंतर ते सर्वांच्या सेवेत येणार आहे.


गोपनीयतेची संपूर्ण काळजी


WhatsAppकडून नवं गोपनीयता धोरण जाहीर केल्यानंतर अॅप वापणाऱ्या अनेकांमध्येच संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेकांच्याच मानत असंख्य प्रश्नही उभे राहिले. याच पार्श्वभूमीवर संदेस हे अॅप तयार करण्यात आलं. गोपनीयतेसाठी या अॅपमध्ये साईन इन करतेवेळी ओटीपीचा वापर करण्यात येणार आहे. या अॅपला Government instant messaging system असंही नाव देण्यात आलं आहे.


अॅपमधील गुणविशेष अर्थात फिचर्स


नेशनल इन्फॉर्मेटिक्स सेंसरकडून नियंत्रीत केल्या जाणाऱ्या Sandes App मध्ये चॅटिंग, मेसेजिंगसह वॉईस कॉलिंगचंही फिचर देण्यात आलं आहे. यामध्ये युजर्सना साईन इन करण्यासाठी तीन पर्याय मिळणार आहेत. एलडीएपी, साईन इन Sandes ओटीपी आणि Sandes वेबच्या माध्यमातून अॅप वापरु शकणार आहात. यापैकी कोणाही एका पर्यायाचा वापर करत युजर्सना ओटीपी मिळवत अॅप वापरता येईल.