मुंबई : प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचा आज 70 वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत प्रमुख भूमिका साकारली आहे.
फारुख शेख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी गुजरातमधील बडोद्यात झाला.1973 मध्ये त्यांनी ‘गर्म हवा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यापूर्वी ते इप्टा या नाट्य संस्थेच्या माध्यमातून काम करत होते.
हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘उमराव जान’, ‘चश्मेबद्दूर’, ‘नूरी’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘माया मेम साब’, ‘कथा’, ‘बाजार’ आदी सिनेमातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
‘उमराव जान’ या सिनेमाची कथा स्त्री व्यक्तीरेखेवर अधारित होती. पण फारुख शेख यांनी यात साकारलेली नवाब सुल्तानची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
त्यांनी सत्यजित रे, मुजफ्फर अली, ऋषिकेश मुखर्जी, केतन मेहता आणि सई परांजपेसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. 27 डिसेंबर 2013 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.
दिवंगत अभिनेते फारुख शेख यांना गुगलची आदरांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 08:56 AM (IST)
प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचा आज 70 वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत प्रमुख भूमिका साकारली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -