गुगलवर सर्च करताना या 4 गोष्टींची खबरदारी घ्या!
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 09:01 AM (IST)
माहितीचं महाजाल धुंडाळताना काही खबरदारीही घ्यावी लागते. गुगलवर अशाही काही गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं तुम्ही टाळलं पाहिजे.
मुंबई: प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा सर्वांचा मित्र गुगल आज 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येकाला डूडलद्वारे हटके शुभेच्छा देणाऱ्या गुगलने स्वत:च्या बर्थडेलाही तसंच जबरदस्त व्हिडीओ डूडल केलं आहे. कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण तातडीने गुगलची मदत घेतो. कोणताही की वर्ड किंवा आपल्याला जे हवं आहे ते गुगलवर सर्च केलं की ढिगभर माहिती आपल्यासमोर उपलब्ध होते. माहितीचं महाजाल धुंडाळताना काही खबरदारीही घ्यावी लागते. गुगलवर अशाही काही गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं तुम्ही टाळलं पाहिजे. 1) ई मेल आयडी लॉग इन करुन गुगलवर सर्च करु नका. कारण यामुळे तुमचा ईमेल आयडी हॅक होण्याची भीती असते. ईमेल आयडी हॅक करुन दुरुपयोग केला जातो. 2) गुगलवर संशयास्पद गोष्टींबाबत सर्च करु नका. कारण सायबर पोलिसांची नजर अशा लोकांवर अधिक असते. 3) गुगल सर्चमध्ये एक अशी सुविधा असते, ज्या माध्यमातून तुमच्या सर्चनुसार जाहिरात दाखवली जाते. कारण गुगलकडे तुमच्या सर्च हिस्ट्रीचा पूर्ण डेटाबेस असतो. यामुळे तुमची माहिती लीक होण्याची भीती असते. शिवाय, सर्चनुसार जाहिरातींचा भडीमारही केला जातो. 4) औषधांसंबंधी कोणतीही माहिती तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च करता, त्यावेळी ती माहिती थर्ड पार्टीला ट्रान्स्फर केली जाते. याआधारे तुम्हाला उपचारासंबंधी औषधांच्या जाहिराती दाखवल्या जातात. शिवाय, मेडिकलची माहिती क्रिमिनल वेबसाईट्सकडे जाण्याची भीती असते. संबंधित बातम्या हॅप्पी बर्थडे गुगल! 20 व्या वाढदिनी खास डूडल