हॅप्पी बर्थडे गुगल! 20 व्या वाढदिनी खास डूडल
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 08:41 AM (IST)
नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलने, डूडलद्वारे आपला 20 वर्षांचा प्रवास दाखवला आहे.
मुंबई: प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा सर्वांचा मित्र गुगल आज 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येकाला डूडलद्वारे हटके शुभेच्छा देणाऱ्या गुगलने स्वत:च्या बर्थडेलाही तसंच जबरदस्त व्हिडीओ डूडल केलं आहे. नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलने, डूडलद्वारे आपला 20 वर्षांचा प्रवास दाखवला आहे. गुगलवर सर्च करताना या 4 गोष्टींची खबरदारी घ्या! गुगलने 20 वर्षांच्या काळात सातत्याने नवनवे बदल केले. आज बर्थ डेनिमित्त गुगलने स्वत:चं डूडल साकारत, गेल्या 20 वर्षातील संस्मरणीय डूडलचा संग्रह सादर केला. हे डूडल गुगलच्या जुन्या आठवणीत घेऊन जातं. स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर 1998 रोजी नवं सर्च इंजिन लॉन्च केलं होतं. जगभरातील माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला व्हावा असा त्यांचा हेतू होता. हा खजिना गुगल म्हणून नावारुपाला आला. गुगल हे जगातील टॉप सर्च इंजिन आहे. जवळपास 150 भाषांमध्ये गुगल उपलब्ध आहे. जगातील 190 हून अधिक देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. गूगलचा इतिहास काय? - 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली. गूगलची स्पेलिंग मिस्टेक - तुम्हाला माहित आहे का, गूगलच्या स्पेलिंग मिस्टेकमागील किस्सा? खरंतर आताच्या 'Google'चं नाव ठेवायचं होतं 'Googol'. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे 'Google' असं झालं आणि तेच नाव पुढे प्रसिद्ध झालं . आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिलं जातं. बरं त्याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव 'बॅकरब' असं ठेवलेलं. मात्र, त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले. डोमेन रिजस्ट्रेशन आणि डूडलची सुरुवात - 1997 साली कंपनीने डोमेन रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे 'गूगल' असे नाव ठेवण्यात आले. 2002 साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केलं. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करतं. गूगल..... द जायंट! - गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातील असं होतं की, फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असं प्लॅटफॉर्म बनवण्याचं ठरवलं की, जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. एका क्लिकवर सर्व काही. संबंधित बातम्या कसे रंग भरले जातात गुगल डूडलमध्ये? आता इंटरनेट कनेक्शन शिवायही गुगल मॅप वापरा गुगलच्या चुकीमुळेच तुमच्या मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर गुगलवर सर्च करताना या 4 गोष्टींची खबरदारी घ्या!