Tech News : गूगल आपलं फोटोज साठीचं फ्री स्टोरेट Google Photos लवकरच बंद करणार आहे. या अॅपचे जगभरात करोडो युजर्स आहेत. अशीही माहिती आहे की गूगल आता यूजर्सना 15 जीबी क्लाऊड स्टोरेज फ्री देणार आहे. ज्यामध्ये गूगलचे सगळ्या प्रोडक्ट्ससाठी समान स्पेस मिळणार आहे. गूगलवर आता यूजर्सना 15 जीबी हून अधिक स्पेससाठी आता गूगलचं Google One खरेदी करावं लागणार आहे. यामध्ये यूजरला 100 जीबी स्टोरेजसाठी 19.99 डॉलर म्हणजेच 1460 रुपये मोजावे लागणार आहेत. 


1 जूनपासून मोफत सेवा बंद होऊ शकते


गूगलची विनामूल्य सेवा बंद झाल्यानंतर आपण आपले फोटो सुरक्षित ठेऊ इच्छित असाल तर यूजरला आपले जुने फोटो डाउनलोड करावे लागतील आणि ते आपल्या फोन, लॅपटॉप, पेनड्राईव्ह किंवा इतरत्र कुठेतरी सेव्ह करावे लागतील. गुगलच्या माहितीनुसार, 1 जून 2021 पूर्वी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ 15 जीबी स्टोरेजमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. तसेच जीमेल, गूगल डॉक्स, गुगल शीट्स आणि गुगल ड्राईव्ह सारख्या अन्य गुगल अॅप्समध्ये विनामूल्य 1 जीबी फ्री स्पेस समान प्रमाणात वितरीत केला जाईल.


स्पेस संपत असल्यास गूगल करणार मेल


गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसेल. त्यानंतर तुमच्या अकाउंटची 15 जीबी डेटा स्पेस संपत आली असेल, तर गुगलद्वारे ई-मेलने कळवलं जाईल. स्टोरेज स्पेस संपली असेल तर तुम्हाला Google One अथवा अन्य कोणत्याही क्लाउड स्टोरेजची सेवा खरेदी करून डेटा स्टोअर करता  येणार आहे.