Battlegrounds Mobile India : PUBG प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण पबजीच्या जागी आता Battleground Mobile India भारतात लॉन्च होणार आहे. परंतु, PUBG प्रेमींची पुन्हा एकदा निराशा होऊ शकते. कारण पबजीनंतर आता Battleground Mobile India हा गेमही बॅ करण्याची मागणी होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री आणि अरुणाचलचे प्रदेशाध्यक्ष Ninong Ering ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून Battleground Mobile India वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा गेम म्हणजेच, पबचीचं वर्जन आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. 


PUBG Mobile चे भारतात लाखो चाहते आहेत. भारतात पबजीवर बंदी घातल्यानंतर पबजी प्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. पण आता पबजी भारतात परतत आहे. नव्या रंगात, नव्या ढंगात Battlegrounds Mobile India च्या नावानं पबजी भारतात परतत आहे. दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी  Krafton ने Battlegrounds Mobile India च्या प्री-रजिस्ट्रेशनच्या तारीखेची घोषणा केली होती. या गेमच्या प्री-रजिस्ट्रेशन सुरुवात झाली आहे. लवकरच हा गेम लॉन्च करण्यात येणार आहे. 


प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या फॅन्सना मिळणार रिवॉर्ड्स 
 
कंपनीने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, प्री रजिस्ट्रेशन करणारे फॅन्स स्पेसिफिक रिवॉर्ड्ससाठी क्लेम करु शकणार आहेत. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय प्लेयर्ससाठीच असणार आहेत. प्री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'प्री-रजिस्ट्रेश' बटनवर क्लिक करावं लागेल. गेम लॉन्च झाल्यानंतर क्लेम करण्यासाठी रिवॉर्ड्स आपोआप उपलब्ध होतील. पबजी मोबाईलप्रमाणेच हा गेम सर्व युजर्सना खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, Battlegrounds Mobile India भारतात येत्या 10 जून रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. लॉन्च करण्यापूर्वी गेमचं बीटा फॉर्मेट काही वेळासाठी रिलीज करण्यात येणार आहे. आता सध्या भारतात अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं आहे. तर iOS युजर्ससाठी पबजीचा हा नवा अवतार तयार केला जात आहे. असं सांगण्यात येत आहे की, जूनमध्ये अॅन्ड्रॉईडसोबत iOS युजर्ससाठीही लॉन्च केला जाऊ शकतो.  


डेटा सिक्युरिटीची काळजी 


कंपनीने सांगितलं की, यंदा डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसीबाबत काळजी घेण्यात आली आहे. क्राफ्टनने सांगितलं की, यंदा युजर्सचा डेटा देशात स्टोअर करण्यात आलं आहे. त्याचसोबत यावेळी लॉ-रेग्युलेशनचीही काळजी घेण्यात आली आहे. कंपनीने या गेमनंतर इतर गेम अॅपही लॉन्च केले आहेत. जे सध्या भारतात अवेलेबल नाहीत. 


पालकांचा नंबर द्यावा लागणार 


गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुंलांसाठी नियम थोडे कठोड करण्यात आले आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पालकांचा नंबरही द्यावा लागणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Battlegrounds Mobile India Pre-registration : बॅटलग्राउंड मोबाइल प्री-रजिस्ट्रेशनच्या तारखेची घोषणा; कधी अन् कसं कराल रजिस्ट्रेशन?