Jio Phone Next भारतात 10 सप्टेंबर किंवा गणेश चतुर्थीला भारतात लॉन्च होईल. जून महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या AGM (Annual General Meeting) दरम्यान या फोनची घोषणा करण्यात आली होती. हा अल्ट्रा-अफोर्डेबल 4G स्मार्टफोन आहे, जो रिलायन्स जिओ आणि गुगलने विकसित केला आहे. जिओ फोन नेक्स्टची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती या क्षणी अधिकृतपणे सार्वजनिक केली गेली नाही. मात्र काही लीक्सद्वारे काही माहिती उघड झाली आहे. जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल प्ले स्टोअरचा अॅक्सेस आहे. व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक री-अलाऊड ऑफ-स्क्रीन टेक्स्ट आणि ट्रान्सलेशन यासारखे फीचर्स यात येतील.
 
जिओ फोन नेक्स्टची भारतातील किंमत


रिलायन्सने एजीएम दरम्यान जाहीर केले होते की जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोन 10 सप्टेंबर किंवा गणेश चतुर्थीला लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार कंपनी फोनच्या विक्रीसंदर्भात आपल्या रिटेल्स पार्टनर्ससोबत चर्चा करत आहे. जिओ फोन नेक्स्टची किंमत या क्षणी उघड झाली नाही, परंतु या फोनची किंमत 3,500 रुपये असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
जिओ फोन नेक्स्टचे फीचर्स 


फीचर्स आणि डिझाईनच्या बाबतीत, जिओ फोन नेक्स्ट हा एक अल्ट्रा-अफोर्डेबल 4G स्मार्टफोन आहे. जो सिंगल रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा सेटअपसह येईल. जिओ फोन नेक्स्ट 2G ते 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. जिओ फोन नेक्स्ट Android 11 गो-एडिशन मिळेल. याशिवाय, फोनला 5.5-इंच एचडी डिस्प्ले मिळेल. क्वालकॉमची QM 215 प्रोसेसर, 2 किंवा 3 जीबी रॅम आणि फोनमध्ये 16 किंवा 32 जीबी स्टोरेज मिळेल. ग्राफिक्ससाठी Adreno 308 GPU मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी 2,500 mAh असू शकते. JioPhone Next 4G VoLTE सपोर्टसह येऊ शकतो आणि त्यात ड्युअल-सिम सपोर्ट उपलब्ध असेल. 


सुरुवातीला 500 रुपये देऊन खरेदी करता येणार 


फायनान्स कंपन्यासोबत पार्टनरशीपमध्ये जिओ युजर्सला फोन 500 रुपये भरुन खरेदी करता येणार आहे. उरलेली रक्कम फोन खरेदीनंतर EMI स्वरुपात भरता येणार आहे. रिलायन्सने पाच कोटी फोन्सच्या विक्रीचं लक्ष्य ठेवलं आहे.