‘गूगल प्ले सर्व्हिस’ अॅपचा विश्वविक्रम!
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2017 12:05 PM (IST)
गूगलच्या प्ले सर्व्हिस अॅपने विक्रमाची नोंद केली आहे. पाच अब्ज डाऊनलोड्सचा टप्पा गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पार केले आहेत.
मुंबई : गूगलच्या प्ले सर्व्हिस अॅपने विक्रमाची नोंद केली आहे. पाच अब्ज डाऊनलोड्सचा टप्पा गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पार केला आहेत. ‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच अॅप मॅन्युअली डाऊनलोड केलेले नाहीत, तर अनेक स्मार्टफोनमध्ये बाय डिफॉल्ट गूगल प्ले सर्व्हिस अॅप दिले जाते. त्यामुळे पहिल्यापासूनच इन्स्टॉल असलेल्या अॅपचीही डाऊनलोड्समध्ये नोंद होते. गूगल प्ले सर्व्हिससोबतच यू ट्यूब, क्रोम, गूगल मॅप्स, जीमेल, सर्च हे अॅपही अनेक स्मार्टफोनमध्ये मोफत इन्स्टॉल करुन दिले जातात. त्यामुळे बहुतांश स्मार्टफोनवर गूगलचे हे सातही अॅप असतात. मात्र, या सातमधील एखादं अॅप नसलं, तरी प्ले सर्व्हिस सर्वच स्मार्टफोनमध्ये असतंच. दरम्यान, गूगलवर ‘लिप्पझन’ नावाचं स्पायवेअर आलं असून, यूजर्सचे टेक्स्ट, मेसेजेस, व्हॉईस कॉल्स, लोकेशन डेटा आणि फोटो जप्त करतं. गूगलने या स्पायवेअरला ब्क केले आहे.