नवी दिल्ली : जिओच्या दणक्याने हादरुन गेलेल्या भारतातील टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्यांनी आता नव-नवे प्लॅन लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. आयडिया, एअरटेलनंतर आता व्होडफोननेही 4G सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंची ऑफर देत नवे प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी आणले आहेत.
499 रुपयांपासून सुरु होणारे हे पोस्टपेड प्लॅन मोफत 4G/3G इंटरनेट डेटासोबत लोकल आणि एसटीडीसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देण्यात येत आहेत. पोस्ट पेड प्लॅन लॉन्च करताना व्होडाफोनचे भारतातील मुख्य वाणिज्य अधिकारी संदीप कटारिया यांनी सांगतिले, “नव्या व्होडाफोन रेडसोबत आता ग्राहकांना डेटा रोमिंगची चिंता भेडसावणार नाही. हे ऑल इन वन प्लॅन  ग्राहकांना डेटा, रोमिंग आणि कॉलिंग अशा तिन्हीमध्ये सवलत देणार आहे. व्होडाफोन रेडच्या ग्राहकांना हे प्लॅन नक्की आवडतील.”
  • 499 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, 100 लोक आणि नॅशनल एसएमएस, त्याचसोबत 4G स्मार्टफोन युझर्ससाठी 3GB डेटा मिळेल. तर 4G स्मार्टफोन नसलेल्या युझर्सना 1GB डेटा मिळेल.
  • 699 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये 4G स्मार्टफोन युझर्ससाठी 5GB इंटरनेट डेटा, 4G स्मार्टफोन युझर्स नसलेल्यांसाठी 2.5GB इंटरनेट मोफत मिळेल. त्याचसोबत, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल  रोमिंग, 100 लोक आणि नॅशनल एसएमएस मिळणार आहे.
  • 1,999 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये 4G स्मार्टफोन युझर्सना 24GB इंटरनेट डेटा मिळेल. तर ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन नसेल, त्यांना 20GB इंटरनेट डेटा मिळेल. त्याचसोबत अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग आणि 100 एसएमएसही मिळतील.
प्लॅन रेड रु.499 रेड रु.699 रेड रु.999 रेड रु.1299 रेड रु.1699 रेड रु.1999
मोफत काय? अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग
मोफत डेटा (Non-4G) 1 GB 2.5 GB 5 GB 8 GB 16 GB 20 GB
मोफत डेटा (4G युझर्स) 3 GB 5 GB 8 GB 12 GB 20 GB 24 GB
राष्ट्रीय रोमिंग इनकमिंग मोफत मोफत मोफत मोफत मोफत मोफत
मोफत लोकल आणि नॅशनल SMS 100 100 100 100 100 100
हे सारे प्लॅन मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील ग्राहकांसाठी लागू असणार नाहीत.