मुंबई : प्रख्यात गुगल कंपनी आणि डेनिम जीन्स निर्मिती करणारी लेवाईस कंपनी एक अनोखं जॅकेट बनवत आहे. या जॅकेटच्या मदतीने तुम्ही चक्क स्मार्टफोनला कमांड देऊ शकाल.

 
गुगल आणि लेवाईस संयुक्तपणे बनवत असलेल्या जॅकेटला वेगवेगळ्या जागी टच केल्यास तुमच्या स्मार्टफोनला सूचना देता येऊ शकतात. हे जॅकेट वॉटरप्रुफ असल्यामुळे प्रवासातही तुम्ही बिनधास्त वापरु शकाल.

 
जॅकेटने काय करु शकाल?
1. मॅप आणि डायरेक्शन
2. म्युझिक
3. फोन रिसिव्ह करणे

 

वायरलेस कनेक्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन या जॅकेटला जोडू शकाल, तर चार्जिंगसाठी जॅकेटमध्ये एक यूएसबी कनेक्टर असेल.

 

पाहा व्हिडिओ :