Google Map Features : विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार माणसांच्या गरजा बदलत गेल्या. गुगल मॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. गुगल मॅपच्या माध्यमातून तुम्ही आता फक्त लोकेशनच शोधू शकत नाही तर याबरोबरच अनेक फीचर्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता. हे फीचर्स कोणते ते जाणून घ्या. 


एक पेक्षा जास्त लोकेशन निवडू शकता 


Google नेहमी त्यांच्या यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि त्यासाठी गुगलमार्फत नवीन फीचर्स अपडेट केले जातात. Google ने त्यांच्या Maps सेवेमध्ये स्टॉपपेज जाहिरात वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणे जोडू शकता. Google Maps वर जास्तीत जास्त तुम्ही नऊ स्टॉप जोडले जाऊ शकतात.


टोल टॅक्सची माहिती मिळवू शकता


कंपनीने नुकतेच गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. हे नवीन फीचर टोल टॅक्सच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला किती टोल टॅक्स भरावा लागेल हे तुम्हाला कळू शकतं. गुगल मॅपचे हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहेत.


पेट्रोल पंप आणि एटीएमची माहिती


लांबचा प्रवास करण्यासाठी जास्त पेट्रोल आणि इंधनाची गरज साहजिक आहे. अशा वेळी गुगल मॅप यूजर्सना या एॅपच्या माध्यमातून पेट्रोल पंप रेस्टॉरंट्स, कॅफे, फास्ट फूड कॉर्नर आणि एटीएमची माहिती देते जे यूजर्सच्या मार्गात येतात.


ट्रॅफिक जॅमची माहिती


प्रवास म्हटला की वाहतुकीचा, ट्रॅफिक जॅमचा अनुभव हा आलाच. अशा वेळी ट्रॅफिकमध्ये बराच वेळ वाया जातो. ही सुविधा गुगल मॅप्समध्येही देण्यात आली आहे, ज्यामुळे यूजर्सना मार्गात कोणत्या प्रकारची ट्रॅफिक जाम आहे हे कळेल. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही ट्रॅफिकचा अंदाज घेऊन तुमचा मार्ग बदलू देखील शकता.   


महत्वाच्या बातम्या :