गुगलचे हे मोफत अॅप असून या अॅपच्या सहाय्याने फोटो स्कॅन करता येणार आहे. एखादा फोटो उलटा असल्यास या अॅपमुळे तो फोटो तुम्ही सरळही करु शकता. फोटो जास्तच उजळ असल्यास त्याचा उजळपणाही कमी करता येईल.
हे अॅप अँड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएस सिस्टिमवर उपलब्ध असणार आहे. या अॅपमुळे आपण आपले जुने फोटोही आता डिजिटल स्वरुपात जतन करुन ठेवता येतील.